महाराष्ट्र ग्रामीण
दुधगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर बाचणी-कोल्हापूर मार्ग बंद.

बाचणी ता. कागल (सलीम शेख) : मे महिन्यातच दुधगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने बाचणी, ता. कागल येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने कोल्हापूर-बाचणी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे व्हणाली, साके आणि बेळवले खुर्द येथील वाहतूकही ठप्प झाली आहे. पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरळीत सुरू असली तरी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावर्षी मे महिन्यातच दुधगंगा धरण भरले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पेरणीच्या तोंडावरच नदीला पूर आल्याने शेतीत पाणी साचले असून, शेती मशागत कामे खोळंबली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे खरीप हंगामातील पिकांवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.