महाराष्ट्र ग्रामीण

बाचणीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; तीन ज्वेलर्ससह पाच ठिकाणी लाखोंची चोरी

बाचणी (सलीम शेख) : रविवारी (काल) मध्यरात्री बाचणी गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ज्वेलर्सची दुकाने, एक बार आणि एका घराला लक्ष्य केले. या मोठ्या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, कागल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


रविवारी रात्री गावकरी गाढ झोपेत असताना, चोरट्यांनी एकाच रात्रीत अनेक ठिकाणी हात साफ केला. यामध्ये गावातील तीन नामांकित ज्वेलर्स दुकानांचा समावेश आहे, जिथून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्वेलर्स दुकानांसोबतच एका बारमध्येही चोरी झाली असून, एका घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले.


या घटनेमुळे बाचणी गावात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. गावातील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button