महाराष्ट्र ग्रामीण

वाढदिवसाचा खर्च टाळत, गरजूंना मदतीचा हात, पवार यांचा आदर्श वाढदिवस!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत, गोकुळ शिरगावचे रहिवासी सुरज पवार यांनी के.डी. पाटील बापू मल्टी ऑब्जेक्टिव्ह संस्था गोकुळ शिरगाव संचलित आदित्य प्ले हाऊसच्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य प्ले हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खेळण्यांचे वाटप करण्यात आले.


यावेळी दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे नितीन भाऊ पाटील यांनी खास उपस्थिती लावत सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, स्कूल युनिफॉर्म, टी-शर्ट, हाफ पॅन्ट आणि लहान मुलांसाठी खेळण्यातली घोडागाडी व खाऊ वाटप करण्यात आले. सुरज पवार यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.
याप्रसंगी के.डी. पाटील बापू मल्टी ऑब्जेक्टिव्ह संस्थेच्या वतीने पाटील समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि नेत्यांना संस्थेला भेट देऊन मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याला बळकटी देण्यासाठी या मदतीची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


या कार्यक्रमासाठी भगवान कदम, महेश चावरे, बाळू मगदूम, अमित कागले, सचिन घोडके, संतोष बोरडे, विजय एकशिंगे, संजय शिरगावे, अनिल सावंत, निरंजन घाटगे, संदीप पाटील, ईश्वर जाधव, भारत डाफळे, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे महिला समुपदेशक अधिकारी विजयसिंह पाटील, दीपक पाटील, पद्मावती डाफळे, मीनाक्षी पाटील, चित्रकार दिगंबर पाटील आणि शिक्षिका अश्विनी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरज पवार यांच्या या वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमधून समाजात एक चांगला संदेश पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button