महाराष्ट्र ग्रामीण

नेर्लीमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न!!

नेर्ली (सलीम शेख) : कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेर्ली येथे आज (गुरुवार, २५ मे २०२५) मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.


यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील , पाचगावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण गाडगीळ, इस्पूलीचे गजानन पाटील, भिकाजी खबाले, संतोष पाटील, कणेरीचे अर्जुन इंगळे, अतुल पाटील, पृथ्वीराज पाटील, ओंकार व्हनकुरे आदी उपस्थित होते. हे सर्वजण आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज दादा यांचे समर्थक तसेच परिसरातील ग्रामस्थ होते.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या नेत्र आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button