महाराष्ट्र ग्रामीण
सोनवडे येथे बुद्ध जयंती उत्साहात; आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते अभिवादन!

सोनवडे ता. शाहुवाडी (सलीम शेख ) : सोनवडे येथील पंचशिल तरुण मंडळ पंचशिलनगर यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी भेट दिली.
आमदार डॉ. माने यांच्या हस्ते महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी पंचशिल तरुण मंडळ पंचशिलनगर सोनवडे यांच्या वतीने आमदार डॉ. माने यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी सभापती विष्णू पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव वाघमारे, उत्तम वाघमारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश डोंगरे, वसंत पाटील, अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.