उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शिरोलीत महाडिक कुटुंबाला सदिच्छा भेट; जुन्या आठवणींना उजाळा!

शिरोली (सलीम शेख ) : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिरोली येथे महाडिक कुटुंबीयांना सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देत दिलखुलास गप्पा मारल्या.
महाडिक परिवाराच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, स्वरूप महाडिक, मंगलताई महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक, माजी नगरसेवक आदिल फरास, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, मकरंद बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भेटीनंतर, शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना श्री महालक्ष्मीची मूर्ती भेट देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी शिरोली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या भेटीमुळे शिरोली परिसरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.