महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर खंडपीठ आणि वकिलांच्या सुविधांसाठी ठोस पावले उचलणार: आमदार चंद्रदीप नरके!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने आमदार चंद्रदीप नरके यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली. नुकत्याच झालेल्या वार्षिक निवडणुकीत अँड . व्ही. आर. पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. आमदार नरके यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. व्ही. आर. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान, बार असोसिएशनच्या सदस्यांनी कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन व्हावे आणि वकिलांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली. यासाठी मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती त्यांनी आमदार नरके यांच्याकडे केली.
आमदार चंद्रदीप नरके यांनी बार असोसिएशनच्या सदस्यांना आश्वस्त केले की, या मागण्यांसाठी सर्वांना सोबत घेऊन ठोस पावले उचलली जातील. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button