महाराष्ट्र ग्रामीण

हुपरी येथे अंबाबाई मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न!

हुपरी(सलीम शेख) : श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर हुपरी येथे हनुमान, पूर्व कमान, वास्तुशांती होमहवन, प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि कलशारोहण कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी, श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना प. पू. ईश्वर महाराज, मठाधीश हंचीनाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आली. तर, कलशारोहण पूजन आणि पूर्व कमान, पवळ्या (प्रवेशद्वार) यांचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने दादा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.
या मंगलमय प्रसंगी गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख अजित सुतार, शहर प्रमुख नितीन गायकवाड, युवा शहर प्रमुख अजित उगळे, उद्योगपती राजेंद्र शेट्टे, नगरसेवक दौलत पाटील, संभाजी हांडे, किशोर निकम, संजय लोहार, धैर्यशील भोजकर, सचिन शिंदे, यशवंत पाटील, शहाजी गायकवाड, विठ्ठल पाटील, विजय जोशी, प्रकाश देशपांडे, गोपी शेट्टे, महेश माळी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा सोहळा हुपरी परिसरातील धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button