वक्फ कायद्याच्या समर्थनार्थ वक्फ सुधार जनजागरण अभियान कार्यशाळा इचलकरंजीत संपन्न!

इचलकरंजी (सलीम शेख) येथील भाजपा कार्यालयात, भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने वक्फ कायद्याच्या समर्थनार्थ वक्फ सुधार जनजागरण अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आण्णा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेत पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अशरफ वांकर, प्रदेश उपाध्यक्ष आकाशा मुल्ला आणि कोल्हापूर जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी सरकार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वक्फ कायद्याचे महत्त्व आणि त्यातील सुधारणांची आवश्यकता यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा सरचिटणीस औरंग शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यशाळेला इचलकरंजी शहर अध्यक्ष अली हुसेन खान, जिल्हा सरचिटणीस रियाज सनदे, सह प्रमुख मुमताज कनवाडे, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा रेश्मा शेख, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा बानू नदाफ, शहर अध्यक्ष महिला मोर्चा अश्विनी कुबडगे, रसूल सय्यद, सय्यद अली देसाई, दीपक पाटील, महम्मद नदाफ, तय्यब गडकर, फारूक बागेवाडी, इम्तियाज मुजावर आणि बबलू मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.