पत्रकार राजू म्हेत्रे खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त!

इचलकरंजी (सलीम शेख ) : येथील पत्रकार राजू म्हेत्रे यांना न्याय मिळाला असून, त्यांच्यावरील खोटा गुन्हा न्यायालयाने रद्द केला आहे. 2021 मध्ये राजू म्हेत्रे यांनी ‘महाराष्ट्र आपला न्यूज’ या वृत्तवाहिनीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या कारभारावर आवाज उठवला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी म्हेत्रे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला होता.
या खोट्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र मेहरबान न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी झाली असता, पोलिसांना राजू म्हेत्रे यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे मेहरबान न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत राजू म्हेत्रे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या राजू म्हेत्रे यांच्यासाठी हा मोठा विजय आहे. त्यांच्या वतीने या खटल्यात ॲडव्होकेट आय. एम. जमादार यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील गैरकारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचे मनोबल वाढले आहे.