महाराष्ट्र ग्रामीण
ग्रामीण रुग्णालय कागल येथे तंबाखू नकार दिवस उत्साहात साजरा!

कागल (सलीम शेख ) : कागल येथील ग्रामीण रुग्णालय येथे ३१ मे २०२५ रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त तंबाखूचे दुष्परिणाम आणि कर्करोगाशी संबंधित जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. थोरात मॅडम यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकला. डॉ. धनंजय पाटील सर आणि डेंटिस्ट प्रियांका किल्लेदार मॅडम यांनी कर्करोग आणि मुख आरोग्यावर तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. सुलभा पाटील मॅडम, आरोग्य निरीक्षक श्री. आर.पी. दांगट, इन्चार्ज सिस्टर श्रीमती भारती चोथे, दंत सहाय्यक श्री. गणेश गोंधळी यांच्यासह रुग्णालयाचे इतर कर्मचारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे समाजात तंबाखू विरोधी जनजागृती वाढण्यास मदत होईल.