महाराष्ट्र ग्रामीण

कागल भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू!

कागल (सलीम शेख) : शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील लक्ष्मी टेकडीजवळ झालेल्या अपघातात एका मोटरसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. आनंद पाल (वय अंदाजे ३५, राहणार गोकुळ शिरगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, KA-23-N-7815 क्रमांकाच्या कार चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरच्या NL-01-AD-0220 क्रमांकाच्या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक आडवी गाडी घातली. त्याचवेळी, ट्रेलर चालकाने रस्त्यावर अचानक ब्रेक लावला. यामुळे पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या MH-09-FE-3611 क्रमांकाच्या मोटरसायकलची ट्रेलरला मागून जोरदार धडक बसली.


या अपघातात मोटरसायकलस्वार आनंद पाल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बी. एस. कोचरगी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button