सह्यगिरी शैक्षणिक विचार मंचाचे संस्थापक रघुनाथ शिंदे यांचा पन्नासावा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

असंडोली (सलीम शेख): सह्यगिरी शैक्षणिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आणि असंडोली केंद्रीय प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक रघुनाथ सयाजी शिंदे यांचा पन्नासावा वाढदिवस सह्यगिरी परिवाराने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला.
या वाढदिवसानिमित्त सह्यगिरी परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले. सह्यगिरी अभ्यासिका येथे भेट देऊन आर्थिक अडचणीतील एका विद्यार्थिनीला शैक्षणिक खर्चासाठी धनादेश देण्यात आला. तसेच, वेतवडे फाटा येथे रस्त्याच्या कामावर असलेल्या कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आणि महिलांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले.
असंडोली प्राथमिक शाळेत आयोजित उन्हाळी शिबिरात विद्यार्थी आणि पालकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय, ‘सह्यगिरी दप्तर पाटील’ योजनेअंतर्गत शाळेतील नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रघुनाथ शिंदे यांनी वैयक्तिक योगदान दिले.
असंडोली केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मैदानावर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिंदे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचे कौतुक करण्यात आले.