वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांची डी.के.टी.ई. संस्थेला सदिच्छा भेट; नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा घेतला आढावा!

इचलकरंजी (सलीम शेख ) : नागपूर विभागाचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने आणि सहाय्यक आयुक्त गणेश वंडकर यांनी नुकतीच येथील डी.के.टी.ई. (DKTE) टेक्सटाईल अॅण्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेमध्ये सुरू असलेल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच, वस्त्रोद्योग क्षेत्रात होत असलेल्या नवीन आणि आधुनिक उपक्रमांविषयी सखोल चर्चा झाली.
या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी आयुक्त संजय दैने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीमुळे संस्था आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याची प्रशंसा केली.
याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह दत्ता टेके, किरण पोवार, राजू गिरी, सुभाष बलवान, चंद्रकांत भोपळे, मुस्ताक मुजावर, सुहास राजमाने आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या भेटीमुळे संस्थेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हाने समजून घेण्यास मदत मिळाली, अशी प्रतिक्रिया संस्थेकडून व्यक्त करण्यात आली.