Uncategorized

कोल्हापूर केएसए मुलींचा फुटबॉल संघ शिरपूर स्पर्धेसाठी रवाना

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिरपूर येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या सबज्युनिअर मुलींच्या आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) चा संघ शिरपूरकडे रवाना झाला.


या संघात कौशल्या (गोलरक्षक), समीक्षा पाटील चौगुले (कर्णधार), सानिका पाटील, देवयानी पाटील, पूर्वी पोवार, आराध्या धनवडे, कौशल्या शिवाजी पाटील, सृष्टी वांद्रे, आदिती पाटील, शमिका माने, स्वरा धनवडे, कंचन माळी, सिद्धी पाटील, दिव्या गायकवाड, साक्षी नावळे, कादंबरी पाटील, काव्या शिंदे, प्रांजली गाडीवड्डर आणि प्रज्ञा नांगरे यांचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक म्हणून रघू पाटील आणि व्यवस्थापिका म्हणून समीक्षा पोवार काम पाहणार आहेत.


या संघाला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, आणि मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button