Uncategorized
कसबा सांगावमध्ये ११ लाखांची घरफोडी; १५ तोळे सोने, चांदी लंपास!

कसबा सांगाव ता. कागल (सलीम शेख) : ताकी धरणग्रस्त येथील गुरुनाथ बाळू पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री सुमारे ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये १५ तोळे सोन्याचे दागिने, ९०० ग्रॅम चांदी आणि रोख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा समावेश आहे.
मुख्य रस्त्याच्या ठिकाणी असलेल्या पाटील यांच्या घरातील लोक राधानगरी तालुक्यातील वाकी या मूळ गावी गेले असता ही चोरी घडली.
रोख रक्कम: ५०,००० रुपयांहून अधिक व सोनाचे सर्व दागिने चोरीले.
पुढील तपास
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.