महाराष्ट्र ग्रामीण
कणेरीवाडीत केबल चोरट्याला गावकऱ्यांनी पकडून आणि पोलिसांच्या हवाली केले!

कणेरवाडी (सलीम शेख) : कणेरीवाडी येथे काल मंगळवारी दुपारी कणेरीवाडी येथील पाझर तलावाजवळ संदीप पाटील यांच्या पाण्याच्या मोटारीची २०० फूट कॉपर केबल चोरी करताना किशोर हनुमंत माने (वय ३१, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचा एक साथीदार पळून गेला, असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले.
चोरी करताना पकडलेल्या केबलची किंमत सुमारे १२ हजार रुपये असून ती बेस्ट क्वॉलिटी कंपनीची आहे. या घटनेनंतर शेतकरी संदीप अशोक पाटील (वय ४०) यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित आरोपी किशोर माने याला अटक केली असून, चोरीचा केबल जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल संदेश कांबळे करत आहेत.