महाराष्ट्र ग्रामीण
मदर्स डे फोटोग्राफी स्पर्धेत पाचगावचे अजिंक्य खराडे विजयी!

कोल्हापूर (सलीम शेख) : भोपाळ येथील ‘हर हेल्थ हॉस्पिटल’ने मदर्स डेनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव येथील अजिंक्य विजयकुमार खराडे याने विजेतेपद पटकावले आहे.
देशभरातून ३०० हून अधिक छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, त्यापैकी १७५ उत्कृष्ट छायाचित्रे प्रदर्शनासाठी निवडण्यात आली होती. या निवडक छायाचित्रांमध्ये पाचगाव येथील ‘पिक्सल फोटो स्टुडिओ’चे अजिंक्य विजयकुमार खराडे यांच्या छायाचित्राला पाचवा क्रमांक मिळाला.
अजिंक्यला या यशाबद्दल रोख रक्कम, आकर्षक चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे