नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरचा एच.एस.सी. परीक्षेत देदीप्यमान निकाल! विज्ञान शाखेचा निकाल १००% तर कला शाखेचा ८१%

कोल्हापूर (सलीम शेख ) : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, मुस्लिम बोर्डिंग संचालित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरने फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वी (एच.एस.सी.) परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे विज्ञान शाखेचा निकाल तब्बल १००% लागला आहे, तर कला शाखेनेही ८१.००% यश मिळवले आहे.
विज्ञान शाखेत कुमार शेख फौजान मो. जिलानी याने ७७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी शेख शुरैम समीर हिने ७६.६७% गुणांसह द्वितीय, तर कुमारी मुल्ला शिफनाज समीर हिने ७०.५०% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कला शाखेत बागवान साबिया महमद हनीफ हिने ७२.३३% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पत्रेवाले जिया रियाज हिने ६८.५०% गुणांसह द्वितीय, तर सनदी सुमैय्या जैनुद्दीन हिने उल्लेखनीय ८५.८३% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे मुख्याध्यापक श्री. ताशिलदार एम.एम. आणि प्राचार्य श्री. असलम काझी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले आहे.
संपूर्ण विद्यालय परिवार आणि संस्थेने या उत्कृष्ट निकालाबद्दल आनंद व्यक्त केला असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.