महाराष्ट्र ग्रामीण

आरपीआय शहर उपाध्यक्षपदी विकी कांबळे यांची निवड!

कोल्हापूर (सलीम शेख ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कोल्हापूर शहर उपाध्यक्षपदी विकी कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. विकी कांबळे यांनी पक्षाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत केलेल्या भरीव कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
विकी कांबळे यांनी पक्षाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा लढा यशस्वीपणे पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांची ही निवड झाली आहे.
शनिवारी (१९ मे २०२५) झालेल्या एका कार्यक्रमात आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते विकी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडपत्रावर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, राज्य सचिव बी. के. कांबळे, जयसिंगराव पाडळीकर आणि महाप्रदेश सचिव मंगलराव माळगे यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button