सांगली फाट्यावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी; जीवितहानी टळली!

शिरोली (सलीम शेख) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे काल सकाळी एक विचित्र अपघात झाला. बेळगावकडे निघालेल्या आयशर MH-23.AU.5909 टेम्पोला मागून एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर टेम्पोचालकाने प्रसंगावधान दाखवत स्वतःला वाचवले. सध्या शिरोली एमआयडीसी पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध सुरू आहे.
हा अपघात सांगली फाटा परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधतो. वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याची आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.