महाराष्ट्र ग्रामीण

शिवसेना पट्टणकोडोली यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा: गरीब प्लॉटधारकांना हक्काच्या जागेपासून वंचित ठेवल्याने संताप!

पट्टणकोडोली (सलीम शेख ) : मौजे पट्टणकोडोली गावातील एमआयडीसी (MIDC) लगतच्या गट क्रमांक १२५५ मधील जमिनीवर एमआयडीसीमधील काही कंपन्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ४० गरीब प्लॉटधारक त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहिले आहेत. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि लवकरात लवकर अतिक्रमण हटवून गरीब प्लॉटधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पट्टणकोडोली शहर यांच्या वतीने अप्पर तहसीलदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ही जमीन सरकारने पट्टणकोडोली येथील गरीब लोकांना मोफत प्लॉट वाटपासाठी दिली होती. मात्र, आता याच जागेवर आणि उर्वरित जमिनीवर एमआयडीसीतील कंपन्यांनी अतिक्रमण केल्याने अनेक कुटुंबे निराधार झाली आहेत. यामुळे त्यांच्या हक्काच्या जागेवर त्यांना घर बांधता येत नाहीये, अशी त्यांची तक्रार आहे.
या प्रकरणात तातडीने लक्ष घालून जागेवरील अतिक्रमण हटवावे आणि गरीब प्लॉटधारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर यावर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना पट्टणकोडोली शहर यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना शिवानंद सदाशिव पणदे (शिवसेना पट्टणकोडोली शहरप्रमुख), सुनील बारैय्या (कामगार आघाडी तालुका प्रमुख), विठ्ठल केरू (शिवसैनिक), किरण पवार, आणि अविनाश जाधव उपस्थित होते. या आंदोलनामुळे प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button