तामगाव येथे DMR फाउंडेशनतर्फे सैनिकांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार

तामगाव (सलीम शेख): तामगाव, ता. करवीर येथे DMR फाउंडेशन संचालित श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्राच्या वतीने गावातील भारतीय लष्कर दलातील जवानांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात वीरमरण पत्करलेल्या जवानांना फाउंडेशन आणि उपस्थित सर्व उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात सहभागी सैनिकांना झाडे, शाल, श्रीफळ आणि स्वामी फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले. तामगाव गावातील जवान मिलिंद घाटगे, आकाश देसाई, विनायक पुजारी, राजेश हराळे, उमेश गंगाधर यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक रणजित दुर्गुळे होते, तर मीनाक्षी दुर्गुळे (अध्यक्षा) आणि संगीता पाटील (उपाध्यक्षा), मालती सावंत (सेक्रेटरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व महिला संचालक मंडळ आणि सेवा केंद्राचे कार्याध्यक्ष अनिल खामकर, जितेश तटकरे, युवराज देसाई, अजय देसाई, संदेश दिवेकर, राहुल सुर्वे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेक्रेटरी मालती सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.