महाराष्ट्र ग्रामीण

संत बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव उंचगाव येथे उत्साहात संपन्न!

उचगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील उंचगाव येथील मणेर मळा येथे संत बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुरुमाऊली कृष्णा डोने महाराज यांच्या उपस्थितीत हा भंडारा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत, मंगलमय वातावरणात आणि हलगी-कैकलाच्या निनादात पार पडला. यावेळी विविध भजनी मंडळांनी हजेरी लावल्याने वातावरण आणखीच आध्यात्मिक झाले होते.


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उत्सवाचे नियोजन छत्रपती शिवाजीनगर मंडळाकडून करण्यात आले होते. बुधवारी, २८ मे रोजी रात्री नऊ वाजता स्वामी समर्थ भजनी मंडळ, साईनाथ भजनी मंडळ आणि बाळूमामा संगीत भजनी मंडळाकडून भजन सेवा सादर करण्यात आली.
गुरुवारी, २९ मे रोजी पहाटे बाळूमामांच्या मूर्तीला अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता श्रींचे अश्व आले, त्यावेळी भव्य पालखी सोहळा आणि वालुंग सोहळा संपन्न झाला. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली.


दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप झाले. गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आणि हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजीनगर येथील सर्व भक्त परिवाराने परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button