यड्राव येथे स्मार्ट मीटर विरोधात ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा!

यड्राव (सलीम शेख) : यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीजजवळील बहेरी वसाहतमधील रहिवाशांनी महावितरणने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बसवलेल्या स्मार्ट मीटरविरोधात तीव्र आंदोलन केले. अचानक वाढलेल्या वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली आणि जुने मीटर पूर्ववत बसवण्याची मागणी केली.
स्मार्ट मीटरमुळे बिलात तिप्पट वाढ झाली असे स्थानिक ग्राहकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी त्यांचे मासिक वीज बिल ₹600 ते ₹700 च्या दरम्यान येत होते. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ते ₹2,000 ते ₹3,000 पर्यंत वाढले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
ग्रामस्थांची मुख्य मागणी महावितरणने कोणतीही परवानगी न घेता हे स्मार्ट मीटर बसवले असून, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थांनी महावितरणला बसवलेले सर्व स्मार्ट मीटर काढून टाकून त्याजागी जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी केली आहे.
यावेळी उपस्थित प्रमुख नागरिक
यावेळी मिथुन जालंदर भिरांजे, औरंग शेख, सागर वाघमारे, अजय जालंदर बिरांजे, शेहनशहा सांगावकर, दस्तगीर कोतडेकर, आलताफ हिपरगी, सुरज शेख, आलताफ देसाई आणि सुनील बेल्लाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.