महाराष्ट्र ग्रामीण

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरात मराठा महासंघाच्या भव्य मिरवणुकीत शिवप्रेमींचा सहभाग!

कोल्हापूर (सलीम शेख ): ६ जून, २०२५: शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर नगरी शिवमय झाली होती. अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी सहभाग घेतला. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.


यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, मल्हारसेनेचे बबनराव रानगे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, शशिकांत पाटील, अँड. धनंजय पठाडे, अशोक भंडारे, अशोक माळी, सतीश बाचणकर यांच्यासह अनेक शिवप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


शिवाजी महाराजांच्या जयघोषाने कोल्हापूर शहर दुमदुमून गेले होते. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला होता. या मिरवणुकीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button