पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव चारचाकीची थांबलेल्या दोन कारना धडक; दीड लाखाचे नुकसान!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : पुणे-बंगळुरू महामार्गावरील कणेरीवाडी हद्दीतील एका हॉटेलसमोर रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी महामार्गाच्या बाजूला थांबलेल्या दोन कारना धडकली. या अपघातात एका कारचे (एमएच-एफ ३००३) सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
या प्रकरणी संभाजी पांडुरंग कुशिरे (वय ४९) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुशिरे आणि अन्य एका व्यक्तीने त्यांच्या गाड्या महामार्गाच्या एका बाजूला थांबवल्या होत्या. त्यावेळी कागलच्या दिशेने भरधाव निघालेल्या चारचाकीने (एमएच ११ डीडी ०७८६) या दोन कारना जोरदार धडक दिली.
धडक देणारी चारचाकी सुनीलकुमार राधेशाम वर्मा (वय २३, सध्या रा. कॉलनी, कागल, मूळचा उत्तर प्रदेश) हा चालवत होता. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसांत करण्यात आली असून, पुढील तपास ए. के. कोरे करत आहेत.