महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाला गती: अडथळे दूर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण आणि सुरक्षेला बाधा ठरणारे अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत, विमानतळाला अडथळा ठरणारी इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स, पाण्याच्या टाक्या आणि अनधिकृत बांधकामे तातडीने हटवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.
प्रमुख निर्णय आणि सूचना


१. अडथळे दूर करा विमानतळाच्या पश्चिम भागातील पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने उभारलेल्या पॉवर लाईन आणि टॉवर धावपट्टी क्रमांक सातवरील विमान उड्डाणात अडथळा ठरत असल्याने ते काढून टाकण्यात येणार आहेत. वैभव सोसायटी येथील झाडे, पाण्याची टाकी, मोबाईल टॉवर, विजेचे खांब तसेच अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी करवीर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.


२. बांधकामासाठी एनओसी बंधनकारक: भविष्यात विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून बांधकामासाठी आवश्यक असलेली एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घेणे बंधनकारक असल्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
३.लक्ष्मीवाडी पुनर्वसन: लक्ष्मीवाडी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी विकसित करण्यात येणाऱ्या भूखंडांचा आढावा घेण्यात आला. यामुळे विमानतळ प्राधिकरणास आवश्यक असलेल्या जमिनीचे हस्तांतरण होऊन प्रलंबित असलेल्या विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाला गती मिळणार आहे.
४.सुरक्षा आणि संरक्षण भिंत: विमानतळाची सुरक्षा आणि संरक्षण भिंत तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली, विमानतळ संचालक अनिल शिंदे यांच्यासह भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, करवीरच्या प्रांत मोसमी चौगुले, कोल्हापूर महापालिकेचे उपयुक्त कपिल जगताप, सिटी फायर ऑफिसर मनीष रणभिसे, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला आणि सुरक्षिततेला नवा आयाम मिळेल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button