महाराष्ट्र ग्रामीण

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने उत्पन्न, रहिवासी दाखला व अन्य सेवांसाठी शिबिराचे आयोजन; महेश जाधव यांची उपस्थिती!

कोल्हापूर (सलीम शेख ) : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने उत्तरेश्वर पेठ मंडल आणि लक्ष्मीपुरी मंडल येथे नागरिकांसाठी मोफत उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, नवीन मतदार नोंदणी तसेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड डिजिटलायझेशन, आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती या सेवांसाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव, माननीय महेश जाधव यांनी भेट दिली.


या प्रसंगी भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, सुनील पाटील, संदीप कुंभार, भरत काळे, मंगलाताई निपाणीकर, अमेय भालकर, विराज चिखलीकर, दिग्विजय कालेकर यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळवण्यासाठी तसेच आधार आणि रेशन कार्ड संबंधीच्या कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध झाली, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि कष्ट वाचले. भाजपच्या या जनोपयोगी उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button