गगनबावडा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतआज राज्याभिषेक दिन!

धुंदवडे (विलास पाटील) : गगनबावडा येथील श्री गगनगिरी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गगनबावडा येथे शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम आज ६ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आज शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम श्री गगनगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी सामाजिक समरसता या विषयावर निवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर मोळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास शासकीय कमिटी सदस्य अर्जुन पाटील, अनिल पडवळ, परशुराम भोगावकर यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.