गोकुळ दूध उत्पादन संघाचे नूतन अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची मुंबईत उपमुख्यमंत्रीशी भेट!

कोल्हापूर (सलीम शेख) : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि अर्थकारणात ‘गोकुळ’ दूध संघाला महत्त्वाचे स्थान आहे. या संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. नुकतीच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) च्या नूतन अध्यक्षपदी निवड झालेल्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नूतन चेअरमन आणि सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. ‘गोकुळ’ हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा एक महत्त्वाचा दुग्ध संघ आहे. तो आणखी सक्षम आणि कार्यक्षम बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नूतन चेअरमन नवीद मुश्रीफ, तसेच गोकुळचे सर्व संचालक उपस्थित होते. यामध्ये मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, विश्वासरावजी पाटील आबाजी, अरुणरावजी डोंगळे, अमर पाटील, शशिकांत चुयेकर, अभिजित तायशेटे, किसन चौगुले, अजित नरके, रणजीत पाटील, नंदकुमार ढेंगे, मुरलीधर जाधव, युवराज पाटील, अंबरीष घाडगे, बाळासाहेब खाडे आणि एमडी योगेश गोडबोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या भेटीमुळे ‘गोकुळ’ दूध संघाच्या आगामी वाटचालीसंदर्भात शासनासोबत सकारात्मक चर्चा झाली असून, संघाच्या विकासासाठी अधिक सहकार्य मिळेल.