गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध व्यवसायांचा सुळसुळाट! तात्काळ कार्यवाही करण्याची महिला सन्मान परिषदेची मागणी!

प्रतिनिधी: (गोकुळ शिरगाव): गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशन हाद्दीमध्ये मधील औॅोगिक वसाहातीमुळे पारिसरात लोकसंख्या झपाटयाने वाढत असून, लोक बाहेर गावाहुन पोटाची खळगी भरण्यासाठी औॅोगिक वसाहातीमध्ये कामानिमित्त येत असतात, पण अगोदरच बेताचा पगार असल्यामुळे त्यात भरीला भर म्हणून मटका, जुगार, तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारू अड्डे आहेतच कुंठुंब उधवस्त करण्यासाठी. अशा या वाढणार्या अवैधव्यवसायांंमूळे बरीच तरूण पिढी हि गुन्हेगारीकडे वळत असुन, अगदी किशोर वयातच त्यांना अवैधव्यवसांची ओढ लागून भारताचे भविष्यातील नागरीक (पीढीच्या पीढी) अगदी लहान वयातच बरबाद होत आहे आणि यामुळेच लहान मुलांमधील गुन्होगारीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेचे दिसुन येते.
मटका, जुगार यावर बंदी असतानाही गोकुळ शिरगांव मध्ये मात्र दिवसा-ढवळया गल्ली बोळात मटक्याच्या टपर्या चालताना दिसतात. तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारू अड्डे हि दिवसेंदिवस वाढतच आहेत. बरेचसे दारू अड्डे व दारूची दुकाने ही रस्त्यालगत असलेने दारू पिण्यासाठी व खरेदी करण्यासाठी आलेले तळीराम आपली वहाने रास्त्यावरच लावून दारू पिण्यासाठी जातात व आगोदरच राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरु असलेने रस्ता लहान असुन त्यात भर म्हणून या दारू दुकानांमुळे वाहन चालकांना अक्षरशा तारेवरची कसरत करत रस्त्यावरून जावे लागते. दारू पिऊन आलेले तळीराम हे थेट रस्त्यावरच जातात व अनेकवेळा रस्त्यावर छोटे मोठे आपघात होऊन वाद – भांडणे निर्माण होत असतात या त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात बरेचशे लोक हे दारूमुळे हायवेवर अपघाती मयत झालेले आहेत व आजही होत आहेत. अशा अनेक तक्रारी लोकांमधुन येत आहेत.
यासाठी गेली ४ ते ५ वषे महिला सन्मान परिषदेच्या वतीने वेळोवेळी निवेदने व आंदोलने करत आहेत, पण अवैधव्यवसाय बंद होण्याऐवजी त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे तरूण पिढी ही व्यसनाधीनच्या मार्गावर जास्त प्रमाणात अडकले जात आहेत. आपल्या व कुठूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले कित्येक कुठूंब या दारू व मटका व जुगारांमुळे अक्षरश: रस्त्यावर आलेले आहेत. घरचा कर्ता पुरूषच दारू व मटक्यामुळे सगळा पगार वाया घालवुन आल्यावर त्याच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. त्यामुळे भारताच्या भावी पिढीचे आयुष्य बरबाद होणेपासुन वाचवण्यासाठी सदर चे अवैधव्यवसाय हे बंद होण्यासाठी महिला सन्मान परिषदेच्या वेळोवेळी निवदने व आंदोलने करण्यात आलेली आहेत.
तसेच, औधोगिक वसाहतीमध्ये महिला कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवून केलेली जाते, समान वेतन कायदा असतनाही जाणीवपूर्वक महिलांना कमी पगार दिला जातो मात्र काम पुरूषां इतकेच करून घेतले जाते, शिवाय महिलांचे पगार वेळेत दिला जात नाही ‘मन राज मन प्रजा’ हा म्हणीप्रमाणे कारखानदारांचा कारभार सुरूआहे. तसेच महिलांना अद्यापही हिन व दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. १५-२० दिवस महिलांकडून काम करून घेतले जाते व पगार द्यायची वेळी आली कि त्यांना काम सोडण्यास भाग पडेल असे वागणूक देवुन त्यांचा पगार दिला जात नाही.
वरील विषयांसंधर्भात गेली ५ ते ६ वषे महिला सन्मान परिषदेच्या वतीने निवेदने आंदोलने केली आहे पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिवसुन येत नाही उलट बेकायदेशीर चालणार्या व्यवसायांना विरोध करण्यार्या महिला सन्मान परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनाच जीवे मारण्याच्या धमक्यांना व नाहक बदनामीला सामोरे जावे लागते. त्यामूळे सदर निवेदनाची तात्काळ दखल घेवून त्यावर योग्य कार्यवाही व्हावी अन्यथा ‘महिला सन्मान परिषद” च्या वतीने मा. पोलिस अधिक्षक सो जिल्हा कोल्हापूर कार्यालयासमोर दि १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आक्रोश आंदोलन करण्यात येणार असलेचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर, संघटक सीमा कांबळे, माया नारपगोल, मंगल राऊत, महासचिव प्राजक्ता कांबळे, संघटक पाकिजा तहसीलदार, लता पाटील, सचिव दीपाली कांबळे, शोभा जगदाळे, संघटक मनीषा कुरणे, संघटक राणी कांबळे, रोख नारपगोल, मनीषा कांबळे आदी महिला पदाधिकारी उपस्तिथ होत्या.