Uncategorized
ज्योती शेळके यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित!

गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगाव येथील ज्योती विठ्ठल शेळके यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘अहिल्यादेवी होळकर तृतीय शताब्दी जयंती’ निमित्त ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ज्योती शेळके यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तसेच कामगार कल्याण महाराष्ट्र शासनानेही पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या या कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन त्यांना मिळालेल्या या नवीन पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.