महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत! श्री तेजा सिंह बाबरी यांची राज्यस्तरीय आयोजन समितीच्या सह निमंत्रकपदी निवड!

प्रतिनिधी: (करवीर) नांदेड चे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री तेजा सिंह बाबरी यांची राज्यस्तरीय आयोजन समितीच्या सह निमंत्रक पदी निवड झाल्याबद्दल वस्ताद ग्रुप गोकुळ शिरगाव एमआयडीसी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, कार्यालय येथे कामगार संघटना कोल्हापूर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
श्री. तेजा सिंह बाबरी यांच्या निवडीने नांदेड जिल्ह्याचे नाव राज्यस्तरीय व्यासपीठावर उंचावले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा लाभ निश्चितच या आयोजन समितीला होईल, असा विश्वास शुभेच्छुकांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता पाटील (वस्ताद) पोलीस मित्र जिल्हा अध्यक्ष नानक सिंग रमेश जैन मानवता अधिकार समिती रणजीत उर्फ अण्णा मोरे आणि कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील तोरसकर यांनी श्री. बाबरी यांना शुभेच्छा दिल्या. वस्ताद ग्रुप गोकुळ शिरगाव एमआयडीसी आणि सर्व पदाधिकारी यांनीही त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस सदिच्छा दिल्या आहेत.