Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या उत्साहात झाली. ‘शाळेचा पहिला दिवस’ या उपक्रमांतर्गत नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
काही शाळांनी शाळेसमोर आकर्षक मंडप उभारले होते आणि जमिनीवर फुलांची चादर पसरून विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि शिक्षकांमधील आनंद लक्षणीय होता.


गोकुळ शिरगावात दुहेरी आनंदोत्सव!
विशेषतः गोकुळ शिरगाव येथील विद्यामंदिर शाळा क्रमांक एकने १०० वर्षांचा देदीप्यमान इतिहास पूर्ण केल्याबद्दल या शाळेत उत्साहाचे वातावरण होते. या ऐतिहासिक क्षणी विद्यार्थ्यांचे स्वागत अधिकच खास बनले होते. तसेच, गोकुळ शिरगाव विद्यामंदिर शाळा क्रमांक दोन मध्येही विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. येथे विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या देण्यात आल्या, शाळेत फुलांची चादर पसरण्यात आली आणि शाळेला आकर्षक फुग्यांनी सजवण्यात आले होते.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोकुळ शिरगाव नंबर 2 ता. करवीर, जि. कोल्हापूर,मोफत पाठ्यपुस्तके,मोफत शाळा प्रवेशोत्सव,
नियमित आरोग्य तपासणी,


मोफत गणवेश,विविध शिष्यवृत्ती योजना,मध्यान्ह भोजन,अपघात सानुग्रह अनुदान अशा अनेक योजना दिल्या जातात.
शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, जि.प. प्राथमिक शाळा, गोकुळ शिरगाव नंबर ,१ आणि २ या शाळेत प्रवेश करूया असा संदेश देत शालेय नवीन वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button