Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात वीज कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ढगफुटीसदृश पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात वीज कोसळल्याची घटना घडली. एमआयडीसीमधील एका मोकळ्या जागेत ही वीज पडल्याचे सांगण्यात आले.
सुदैवाने, ज्या ठिकाणी वीज कोसळली, त्या ठिकाणी त्यावेळी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि जीवितहानी टळली. घटनेनंतर तात्काळ परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अशा नैसर्गिक घटना घडत आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button