महाराष्ट्र ग्रामीण
गोकुळ शिरगाव-कणेरी फाटा येथे खेकडे खरेदी करण्यासाठी गर्दी!

कणेरी फाटा (इरफान मुल्ला) : पावसाळा सुरू झाला की खवय्यांची पावले आपोआपच खेकड्यांच्या दिशेने वळतात. यंदाही गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आणि कणेरी फाटा येथील पुलाजवळ खेकडे खरेदी करण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी दिसून आली.
कागल-गोकुळ शिरगाव परिसरातून पकडलेले खेकडे घेऊन काही मच्छी व्यावसायिक विक्रीसाठी औद्योगिक वसाहती फाट्याजवळ येतात. या खेकड्यांना खरेदी करण्यासाठी आणि केवळ बघण्यासाठीही लोकांची मोठी झुंबळ उडाली होती. दोनशे रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे हे खेकडे घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत होते.
खेकडे पोत्यांनी भरून आणले व विकले जात असल्याने मच्छी व्यावसायिकांना यातून चांगला आर्थिक फायदा मिळत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खेकड्यांची ही मागणी व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचा एक नवीन मार्ग बनली आहे.