गोकुळ शिरगाव मधून दारू हद्दपार होणार!

प्रतिनिधी (कोल्हापूर) : गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशन हाद्दीमध्ये मधील औॅोगिक वसाहातीमुळे गोकुळ शिरगांव पारिसरात झपाटयाने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे गोकुळ शिरगाव परिसरातील वस्त्यांची संख्या हि प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहे. अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या लोकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करायला भरीला भर म्हणून मटका, जुगाराच्या, तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारू अड्डे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे घरातील कर्ता पुरुषाचं अशा अवैध मार्गाच्या जाळ्यात अडकून कितीतरी कुठूम्ब उध्वस्त झाली आहेत. काही घरचे कमावते पुरुष दारूच्या व्यसनामुळे अपघातात मरण पावले आहेत. कुटुंब प्रमुखच व्यसनाच्या जाळ्यात अडकल्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते आणि त्याचाच परिणाम घरातील तरुण पिढीवर होत आहे. त्यामुळे सध्या तरुण पिढी हि व्यसनाधीनता व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. लहान पणातच मुले जर अशा गुन्हेगारीकडे वळत असतील तर मग भारताचे भावी नागरिकांच्या भविष्याचा काय? लहान वयातच बरबाद होत आहेत. यासाठी महिला सन्मान परिषद गेली ४ ते ५ वर्षे निवेदने देऊन आंदोलने करत आहे. पण अवैध्य व्यवसाय बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे महिला सन्मान परिषद यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार, यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत अवैध्य व्यवसांवर कडक कारवाई करण्यासाठीची सकारात्मक चर्चा झाली.
त्यानंतर जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनाही हि गोकुळ शिरगाव मधील कायमचीच दारू बंद व्हावी यासाठी अधीक्षक मा. स्नेहलता नरवणे यांच्याशी चर्चा केली त्यावर हातभट्टी दारूची दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील असे आश्वासन दिले व आडवी बाटलीसाठी योग्य ती प्रक्रिया सुरु करण्यासाठी साकारात्म चर्चा केली, यावेळी संघटनेच्या अध्यक्ष प्रियाताई शिरगावकर, सीमा कांबळे, प्राजक्ता कांबळे, मनीषा कुरणे, पाकिजा तहसीलदार, राणी कांबळे, दीपाली कांबळे आदी महिला उपस्तिथ होत्या.