गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवैद्य दारू अड्ड्यावर धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त! आरोपीला अटक!

प्रतिनिधी: गेली काही वर्षे गोकुळ शिरगाव मधील ‘महिला सन्मान परिषद’ यांच्या वतीने गावातील दारू बंद करण्यासाठी वेळोवेळी निवदने, आंदोलने करत दारू बंदी विषयीचा आपला आक्रोश व्यक्त करत होत्या. पण तात्पुरत्या कारवाईने महिलांमधून खूपच नाराजी व्यक्त होत होती. घरातील करता पुरुष व लहान लहान तरुण मुले व्यसनाधीनतेचा जाळ्यात अडकल्यामुळे कितीतरी कुठुम्ब अक्षरशः उध्वस्त झाली आहेत. ज्या तरुण मुलांनी या वयात शिक्षणाचे धडे घायला हवेत त्या वयात मुले दारू च्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत, आणि त्यामुळे अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे वळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेचे दिसून येते. तसेच किती तरी लोक दारूच्या नशेत रस्त्यावर येऊन अपघाती मृत्युमुखी पडले आहेत. घरातील कमवत्या पुरुषाचा मृत्यू अशाप्रकारे झाल्यामुळे अनेक कुठूम्ब अक्षरशः उद्धस्त झाली आहेत. यासाठीच ‘महिला सन्मान परिषद’ वारंवार गोकुळ शिरगाव मधील दारू कायमचीच बंद व्हावी यासाठी धाडसी कार्यक्रम करत आहेत.
पण आता फक्त तात्पुरती कारवाई नको तर दारू कायमचीच बंद होण्यासाठी महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर यांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन, गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना १९ जुन २०२५ रोजी निवेदन देऊन जर १५ ऑगस्ट २०२५ च्या अगोदर गोकुळ शिरगाव मधील अवैध्य दारू व्यवसायांवर कारवाई नाही झाली तर भारतीय स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याची दाखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक व अधीक्षक राज्य उत्पादन व शुल्क कोल्हापुर यांनी येत्या काही दिवस त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर आज दिनांक २४ जुन २०२५ रोजी गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवैध्य दारू विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर धडक कारवाई करत त्यांच्यावर कडक कारवाई केली. पोलिसांच्या या धडक कारवाईत लाखोंचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. आडोशाला, माळभागात, घरात लपून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई केली व दारू निर्मिती करण्याऱ्या अड्ड्यांवर जेसीबी च्या सहाय्याने बॅरेल व इतर साहित्य उध्वस्त करण्यात आले. या कारवाई मध्ये गोकुळ शिरगाव मधील जयसिंग बागडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाई मुळे गोकुळ शिरगाव मधील अवैध्य दारू विक्रेते व निर्मिती करणाऱ्यांना चांगलीच चाप बसणार आहे. या कारवाई मुळे ‘महिला सन्मान परिषदेकडून’ गोकुळ शिरगाव पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.