महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तलाव ओवर फुल!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापुरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तलाव जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाला आहे, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये भरतो.


इतर सर्व छोटे तलाव १००% भरले आहेत आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पंचगंगा नदीची पातळी वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.राधानगरी धरणही ६३% भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुढील काही दिवसांसाठीचा हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस कोल्हापूरसह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
(२५ जून) आणि पुढील काही दिवस अधूनमधून पाऊस आणि गडगडाटी वादळासह संततधार कायम राहण्याचा अंदाज आहे.पुढील दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका असल्याने प्रवाशांनी अनावश्यक प्रवास टाळावा असेही सूचित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button