महाराष्ट्र ग्रामीण

कणेरी येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या!

कणेरी (इरफान मुल्ला ) : कणेरी दिनांक १४ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० कणेरी ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील पोवार मळा, संदीप धनवडे यांच्या शेतात अमोल उर्फ प्रशांत नेताजी धनवडे (वय ३०, रा. गंगा कॉलनी, काडसिद्धेश्वर हायस्कूल जवळ, कणेरी) यांनी लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
या प्रकरणी मयताचे नातेवाईक तानाजी शिवाजी धनवडे (वय ३९, रा. धनवडे गल्ली, कणेरी) यांनी गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात येऊन वर्दी दिल्यानंतर, दुपारी ११:११ वाजता आत्महत्येची नोंद करण्यात आली. गोकुळशिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button