महाराष्ट्र ग्रामीण
प्रेम त्रिकोणातून मित्राचा घात: करवीर तालुक्यातील केर्ले गावात १८ वर्षीय तरुणाची हत्या!

कोल्हापूर(सलीम शेख) : करवीर तालुक्यातील केर्ले गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम त्रिकोणातून एका जिवलग मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. महेंद्र प्रशांत कुंभार (वय १८) या तरुणाला खणीत ढकलून त्याचा खून करण्यात आला.
या घटनेने केर्ले परिसरात खळबळ उडाली आहे. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि मयत महेंद्र कुंभार हे दोघेही एकाच मुलीवर प्रेम करत होते. आरोपीच्या प्रेमसंबंधात महेंद्र अडथळा ठरत होता, याच कारणामुळे ही हत्या झाल्याचं त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रेमसंबंधातील या गुंतागुंतीतून एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.