महाराष्ट्र ग्रामीण

कागलमध्ये बनावट नंबर असलेली अर्टिगा विकून ४ लाखांची फसवणूक; तिघांना अटक!

कागल: बनावट इंजिन आणि चेसिस नंबर असलेली मारुती अर्टिगा गाडी विकून एका व्यक्तीची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कागलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी कागल पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
संदीप वसंतराव नाळे (वय ५१, रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांनी या फसवणुकीबाबत कागल पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, ३ ते ५ मे २०२५ दरम्यान, तीन आरोपींनी संगनमत करून बनावट नंबर असलेली अर्टिगा गाडी त्यांना ४ लाख रुपयांना विकली. नाळे यांनी ही रक्कम काही प्रमाणात फोन-पे द्वारे आणि उर्वरित रक्कम रोख स्वरूपात आरोपींना दिली होती.
या फसवणुकीची माहिती मिळताच कागल पोलिसांनी तपास सुरू केला आणि संबंधित तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button