महाराष्ट्र ग्रामीण

विद्यार्थ्यानां पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्याचे विविध उपक्रमाने स्वागत!

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांची प्रमुख उपस्थिती

कागल : (पत्रकार- सुभाष भोसले): कागल तालुक्यात २५ हजार २०६ विद्यार्थी : दीड लाखांवर पुस्तके दाखल समग्र शिक्षा योजनेतून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.,२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. कागल तालुक्यातील २५ हजार २०६ विद्यार्थ्यांसाठी एक लाख ५३ हजार ३९ पाठ्यपुस्तके बालभारतीकडून पंचायत समिती स्तरावर उपलब्ध झाली आहेत.

शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये . तसेच शाळेतील विद्यार्थी गैरहजरीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबविले जातात. शाळा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत केले जाणार आहे दरवर्षी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वाटप उपक्रम राबविण्यात येतो. सध्या सर्व पुस्तके दाखल झालेली असून, प्रत्येक शाळेकडे केंद्रानुसार वाटप केले जाणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत .
गतवर्षी एका वर्गासाठी सर्व विषयांचे एकच पाठ्यपुस्तक तयार करायचे, अशी ही एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना होती; परंतु दप्तराचे वजन कमी करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन वाढले होते. तसेच कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर संपूर्ण एकात्मिक पाठ्यपुस्तकेच यंदापासून बंद करण्यात आली आता पूर्वी ज्या पद्धतीने प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पाठ्यपुस्तक दिले जायचे तशीच पाठयपुस्तके यंदा बालभारतीने तयार केली आहेत. त्यामुळे यंदा पहिल्याच दिवशी दिवशी विद्यार्थ्याच्यां हाती एकात्मिक ऐवजी स्वतंत्र पुस्तके पडणार आहेत
शाळेच्या पहिल्याच सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रम राबवून करण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे तसेच तालुक्यातील सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश, शूज-सॉक्सचे व प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियांनार्गत माध्यान्ह भोजनामध्ये मिष्ठान्न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती सारिका कासोटे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी दिली .
कागल पंचायत समिती
इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या

पहिली-२६८५
दूसरी-२६८५
तिसरी-२६८५
चौथी-२९४८
पाचवी-३६३८,सहावी-३१२५,सातवी-३७११,आठवी-३७२९

कागल तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या २५ हजार २०६ असून, त्यांच्यासाठी एक लाख ५३ हजार ३९ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तके केंद्रस्तरावर दाखल होणार आहेत. यावेळी शहाजी पाटील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button