महाराष्ट्र ग्रामीण
नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिरमध्ये उत्साहात साजरा झाला योग दिन; योगासनांसोबत वृक्ष संवर्धनाचाही संदेश!

कागल (सलीम शेख ) : येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिरमध्ये आज, २१ जून रोजी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगासनांच्या प्रात्यक्षिकांसोबतच वृक्ष संवर्धनाचा संदेश देत या दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शाळेतील शिक्षक संतोष सुरेश पाटील सर आणि कृष्णात पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे आजच्या धावपळीच्या जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. निरोगी आयुष्यासाठी योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने योगासनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्वांनी दररोज योगासने करण्याची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले