महाराष्ट्र ग्रामीण

भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, एकजण जखमी कागल पंचतारा करीत वसाहत येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडली घटना!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगावजवळील पंचतारांकित एमआयडीसी, कागलकडे जाणाऱ्या रोडवर मसोबा मंदिरासमोर, पोकार एंटरप्रायझेस दुकानासमोर हलसवडे गावाच्या हद्दीत काल, ११ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एका ६८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत गणपती शेवाळे (वय २४, रा. कौलगे, ता. कागल) हे प्रल्हाद गणपती मगदूम (वय ६८, रा. कौलगे, ता. कागल) यांच्यासोबत बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्रमांक MH.०३.AG.५३२४ वरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक MH.०९.GJ.०८६७ वरील चालक अरुण रामचंद्र टाकळे (वय ६६, रा. कसबा सांगाव, ता. कागल) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, बेदरकारपणे आणि हयगयीने ट्रक चालवून दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.


या धडकेमुळे दुचाकीस्वार अवधूत शेवाळे आणि प्रल्हाद मगदूम हे दुचाकीसह रस्त्याच्या उजव्या बाजूला पडले. त्याचवेळी ट्रकचे पाठीमागील डावे चाक प्रल्हाद मगदूम यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अवधूत शेवाळे यांच्या उजव्या पायाला मार लागला असून, त्यांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर अवधूत शेवाळे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी.जे. मगदूम यांच्या आदेशाने सहायक पोलीस फौजदार पोवार करत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोलीस कॉन्स्टेबल कोरे यांनी नोंद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button