महाराष्ट्र ग्रामीण

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना: रुग्णालये लवकरात लवकर कार्यान्वित करा!

कोल्हापूर (सलीम शेख) : आरोग्य भवन येथे आयोजित विविध बैठकांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. बांधकाम पूर्ण झालेल्या रुग्णालये तातडीने कार्यान्वित करून ती जनतेच्या सेवेत आणण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच, या रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचे नियोजन लवकरात लवकर करण्याचे आदेशही देण्यात आले.

या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्तालयाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक नितीन अंबाडेकर, सहसंचालक (रुग्णालये) डॉ. सुनिता गोलाईत, सहसंचालक (प्रा.आ.के.) डॉ. सुनीता दीक्षित यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.


“रुग्णालयांच्या पूर्ण कार्यान्वयनासाठी सर्व आवश्यक व्यवस्था तत्परतेने कराव्यात, जेणेकरून नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळू शकेल. तसेच, ज्या ठिकाणी मनुष्यबळाची अडचण निर्माण होत असेल, अशा ठिकाणी एजन्सी नेमून कंत्राटी पदभरती करण्यात यावी,” असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने सर्व आरोग्य सुविधा अद्ययावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकामे पूर्ण झाली आहेत, तेथे सर्व साधनसामग्री अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यामुळे आरोग्य सेवा अधिक जलद आणि प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button