कोल्हापूर मनपातील काँग्रेस नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश: शिवसेनेला मोठे बळ!

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते तथा माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रतिभा नाईकनवरे, सुनील कदम, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव, माजी परिवहन समिती सभापती अभिजीत चव्हाण, माजी शिक्षण समिती सभापती रशीद बारगीर यांचा समावेश आहे.
यांच्यासोबतच माजी नगरसेविका रीना कांबळे, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामती, सुनंदा मोहिते, गीता गुरव, अनुराधा खेडकर, संगीता सावंत, अर्चना पागर, कविता माने, सीमा कदम तसेच माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जहांगीर पंडित, भरत लोखंडे, आनंदराव खेडकर, इस्माईल बागवान यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रमुख नेत्यांव्यतिरिक्त संजय सावंत, अभिजीत खतकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुजय चव्हाण, कुलदीप सावतरकर, पार्थ मुंडे, अनिल इंगळे, इजान नागरकटटी, विश्वविक्रम कांबळे, रघुनंदन भावे, आदर्श खडके, दत्ता हळवे, वसीम कांडेकर, अनिकेत कामत, बाबूराव बोडके, महेंद्र कोरडे, मुनीर पटेल या तरुण कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार जयश्री जाधव, आणि शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.