कोल्हापूर शहरात सापांचा सुळसुळाट!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरात सापांचा वाढता सुळसुळाट; २० दिवसांत ५०० हून अधिक सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान पावसाळ्याची सुरुवात होताच नागपूर शहरात अस्वच्छतेने थैमान घातले असून, गटारी आणि चेंबर्समधून पाणी तुंबून नाल्यांमधून वाहत असल्याने मानवी वस्तीत सापांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीत, सर्पमित्र ओंकार काटकर आणि त्यांच्या ‘सह्याद्री रेस्क्यू टीम’ने गेल्या २० दिवसांत शहराच्या विविध भागांतून तब्बल ५०० पेक्षा जास्त सापांना यशस्वीरित्या रेस्क्यू करून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडून जीवदान दिले आहे. रेस्क्यू करण्यात आलेल्या सापांमध्ये १२० विषारी प्रजातींचे साप होते, तर उर्वरित बिनविषारी होते.
प्राणीमित्रांकडून या मुक्या जीवांना त्यांच्या सुरक्षित अधिवासात पोहोचवण्याच्या कार्याचे कौतुक होत आहे. ‘सह्याद्री रेस्क्यू टीम’ने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांना कोठे साप आढळल्यास त्याला कोणतीही इजा न करता, तात्काळ नजीकच्या सर्पमित्राला बोलावून सापांना त्यांच्या सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी मदत करावी.
शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे सापांचा उपद्रव वाढत असल्याने, नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.