महाराष्ट्र ग्रामीण

वेदिका कन्सल्टसी मार्फत राज्य स्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न!

कोल्हापूर: (पत्रकार- सुभाष भोसले)वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्विसेस यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय कर्तृत्ववान पुरस्कार सोहळा शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातून सहकार,सामाजिक, शेक्षणिक ,राजकीय , प्रशासकीय सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचां सन्मान करणेत आला . सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तीनां कर्तुत्ववान आदर्श शिक्षक पुरस्कार, बेस्ट प्लेसमेंट ऑफिसर, कर्तुत्ववान महिला पुरस्कार,कर्तुत्ववान समाजसेवक पुरस्कार इ पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले .
वेदिका कन्सल्टन्सी चे डायरेक्टर युवराज मिरजकर, ज्योती मिरजकर, पूनम मिरजकर अनंतराव मिरजकर,सुरेखा मिरजकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले . या कार्यक्रमाला
साध्वी माताजी, ऍड शैलेंद्र पंडित, ऍड अस्मी पंडित,पांडुरंग बेलेकर,शिवाजीराव जाधव ठाणे जेलर, दि समर्थचे प्रमुख आंबी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात लाठीकाठी या मर्दानी खेळाने झाली
कार्यक्रमाचे स्वागत युवराज मिरजकर तर प्रास्ताविक पाडूरंग बेलेकर यांनी केले या
त्यांनी पोलीस मित्र मदत दल अकॅडमी व पोलीस मित्र मदत दल न्यूज पोर्टल या विषयी माहिती सांगितले
उद्घाटन साध्वी माताजी यांच्या हस्ते झाले. साध्वी माताजी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून कार्य केले पाहिजे, आयुष्यात संस्काराची शिदोरी महत्वाची आहे सर्वांनी त्याचे जतन केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भोसले यांनी केले वैशाली झांजगे, सुमन सुतार आश्लेषा चव्हाण, सागर शेळके ,अग्नेल चव्हाण, ज्योती काशीद बाजीराव पाटील हे प्रमुख उपस्थित होते
आभार प्रदर्शन नारायण लोहार यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button